अख्ख बालपण मोलमजुरी करून आईवडिलांना आर्थिक मदत करत आधारासारखी वाटणारी शोभाताई. तिचा प्रामाणिकपणा तीच्या वागण्या बोलण्यातून झळकवा आणि अनेकांना तिचा हेवा वाटावा. जन्मापासून गरीबी अनुभवली. दारींद्रय अनुभवल पण पावले कधी वाईट मार्गाला वळणी नाही. ती चालतच राहिली नव्या उमेदीने आशेने. आपण कुणाचं वाईट केलं नाही आपलं ही वाईट होणार नाही याच प्रामाणिकतेत.
आम्ही लहान होतो तेव्हा यायची ती आमच्याघरी. ताईची ती जिवलग मैत्रीण. कुणी गंम्मत केली तर मुलकन हसून देणारी. तिला रिकामटेकडे बसलेलं मी कधी पाहिलं नाही. नेहमी आई च्या बाबाच्या मर्जीत राहायची. गोड हसायची पोर.आज भारी आनंद वाटला. तीच्या लग्नाच्या अक्षदा बघून. मोठ्या बहिणींची लग्न झाली लग्नाचं कर्ज सगळं करता करता जगाला वाटलं असावं बाप पोरीचं लग्न करायच विसरला पण बापाचा अर्थच मुळात कर्तव्यात बांधणारा आपला समाज मग तो बाप आहे तो आपली कर्तव्य कसा विसरणार.
-रेखा उत्तमराव राऊत
No comments:
Post a Comment