Saturday, April 30, 2022

बाई : वऱ्हाडी कविता (आत्मबल साप्ताहिक मध्ये प्रकाशित झालेली वऱ्हाडी कविता )


---------------बाई ------------

जन्म देते लेकराले
कळा सोसून अपार...||
करी काबाळ कष्ट हो
माय सकाळ दुपार...||
ओळ घेऊन भावाची
यते बहीण गावाले...||
मने पाईन डोयानं
लई दिसानं भावाले...||
झोपी लागल्या लेकरा
कशी थोपटते आजी...||
तिले माईत पुराण
तिनं रांदली वं सोजी...||
देल्ल लाऊन लगन
नाई भरली करीले...||
भल्या पायटं उटून
बाई जाते मजुरीले...||
आण जाऊन शाळत
लेक झाळून वं घर...||
काळे वाचून पुस्तकं
देते शाबासकी सर...||
लेक शिकून शिकून
 झाली मास्तरीण बाई...||
रोज संबाळून घर
पोरं शिकवाले जाई...||
दर मयन्यात येते
तुमी मनता इटाळ...||
जिले आली नाई पाळी
तिले होईन का बाळ...?
बाळ जीवाचा तुकळा
तिनं पोसलं बाळाले...||
होजो आदारे रे बापु
तीच्या थकल्या काळाले...||
गेला लेक सीमवर.
माय रडलीच नाई...||
होता ठेवला दगड
तिनं काळजात बाई...||
एक असते वं माय
एक असते वं लेक...||
बाळांतीणीलेच कळे
माय ममतेची हाक...||
आंग चोरून बसते
चार चवघात बाई...||
हाय नाजूक नाजूक
भारा उचलते डोई...||
डोई पदर मानाचा
शोबे कुकवाचा भांग...||
अशी लाजू नोको पोरी
नाव नवऱ्याचे सांग...||
जन्म मरणाचा फेरा
बांद बाशिंग कपाळा...||
झाली माय बईन वं
तिले फुटतो जीवाळा...||
येनं पेऊन तू दारू
कुरकुरतेस बाई...||
झालं बरं का वाईट
हुरहूरतेस बाई....||
सुक दुकाचा संसार
याची काय नवलाई...||
होतो आदार माणूस
घर सवारते बाई...||
जाते सोडून गावाले
घरं होते सुनं सुनं...||
असं नशीब बाईचं
सांगा लियलं जी कोण...||
-विदर्भ एक्सप्रेस
समाजमनाची सफर
(रेखा उत्तमराव राऊत )
वऱ्हाडी कविता   :बाई 
____________________________________

चारोळी

तलम सुबक रेशीम द्रव्य कसे
 किड्याच्या अंदर बनतात...||
मन लावून सतत लिहीत राहिलं
 की अक्षरेही सुंदर बनतात....||

-रेखा उत्तमराव राऊत 

शोभाताई

    या दारात ठेवलेल्या अक्षदा बघितल्यात. हू ss या कुणाच्या लग्नाच्या आहे विचारशील तर सांगते. या ना शोभाबाई च्या लग्नाच्या अक्षदा आहे. मी जाणार आहे तीच्या लग्नाला आवर्जून बरे.आता पाचक दिवसांवरच आलय तीच लगीन. गहू चोकरण सुरूय. शेवया बनवणं सुरूय. घर सारव सुरव बाकीये किती कामं आहे तीच्या आईला आता. हो थोडश्या वड्या बनवाव्या लागतील. हांडकी मडकी किराणा कपडा लत्ता किती बरे कामं आहे. अशी ही लग्नाची धांदल च धांदल सुरुये. लगन घरी किती कामं असतात न. हे राहिलं बाई ते करायच राहिलं बाई. आणि काय काय. पण असो असं म्हणतात प्रत्येकाच्या वाट्याचे सुख प्रत्येकाला मिळत असतं. अगदी तसच उशिरा का नको तीच्या आयुष्यात सुखाच्या सरी नक्कीच येईलच. हातात हिरव्या बांगड्या. कपाळी टिकली. मस्त पैठणी वर बट्याचा पीस वर ती खुलून उठणार आहे. तीच्या पायाचे पैंजण नववधूच्या रूपात सुखाचा दर्प पसरवत जाणार आहे. तीच्या सुखाना माझी देखील नजर लागायला नकोच.
                अख्ख बालपण मोलमजुरी करून आईवडिलांना आर्थिक मदत करत आधारासारखी  वाटणारी शोभाताई. तिचा प्रामाणिकपणा तीच्या वागण्या बोलण्यातून झळकवा आणि अनेकांना तिचा हेवा वाटावा. जन्मापासून गरीबी अनुभवली. दारींद्रय अनुभवल पण पावले कधी वाईट मार्गाला वळणी नाही. ती चालतच राहिली नव्या उमेदीने आशेने. आपण कुणाचं वाईट केलं नाही आपलं ही वाईट होणार नाही याच प्रामाणिकतेत.
               आम्ही लहान होतो तेव्हा यायची ती आमच्याघरी. ताईची ती जिवलग मैत्रीण. कुणी गंम्मत केली तर मुलकन हसून देणारी. तिला रिकामटेकडे बसलेलं मी कधी पाहिलं नाही. नेहमी आई च्या बाबाच्या मर्जीत राहायची. गोड हसायची पोर.आज भारी आनंद वाटला. तीच्या लग्नाच्या अक्षदा बघून. मोठ्या बहिणींची लग्न झाली लग्नाचं कर्ज सगळं करता करता जगाला वाटलं असावं बाप पोरीचं लग्न करायच विसरला पण बापाचा अर्थच मुळात कर्तव्यात बांधणारा आपला समाज मग तो बाप आहे तो आपली कर्तव्य कसा विसरणार.

-रेखा उत्तमराव राऊत

Friday, April 29, 2022

श्वासात साठला तू स्पर्शात काय आहे. डोळ्यात पावसाळा ही बरसात काय आहे..-रेखा उत्तमराव राऊत

श्वासात साठला तू स्पर्शात काय आहे.
डोळ्यात पावसाळा ही बरसात काय आहे.
-रेखा उत्तमराव राऊत 

Tuesday, April 26, 2022

सपान

तो आपला औऊतकरी
तिफनीत मी त्याच्या
दाणे पेरत जाईन... ||
आनंदी ठेवीन माझ्या राया
मी त्याचे सुख -दुःख हेरत जाईन...||
पायात पैंजण कपाळी कुंकू
साज त्याच्या नावाचा...||
तोच माय मग तोच बाप
रस्ता त्याच्या गावाचा...||
मग चंद्र चांदण्या अंगणात माझ्या
खेळतील बागडतील... ||
आई बाबा आजी आप्पा ते शब्द
ओठातून ओघळतील...||

-रेखा उत्तमराव राऊत
समाजमनाची सफर 

Monday, April 25, 2022

सुरकुत्या

काठी टेकत टेकत चालू पहायच्या सुरकुत्या.
अबोल कोपऱ्यात बोलू पहायच्या सुरकुत्या.
दिवसातून अर्धी चौतकोर मागू पहायच्या सुरकुत्या.
अबोल होऊन कधी काही सांगू पहायच्या सुरकुत्या.
कुठे कुठे पाळण्याची दोरी हलवत बसायच्या सुरकुत्या.
लहान लहान लेकरांना झुल्यात झुलवत बसायच्या सुरकुत्या.
... एकदा सुरकुत्या मरून गेल्या.
     काहींना वाटलं कटकट गेली.
काहींना सुरकुत्याच काहीच नव्हतं जाणयेणं.
काहींच्या तर आयुष्याचा  भाग असतात सुरकुत्या.

-रेखा उत्तमराव राऊत 

माय

पाट्यावरती खोबरं ती कांडत बसायची.
खसखस घासून भांडी मांडत असायची.
आणि मी जाऊन जवळ तिला म्हणायचं.
आई मला आहे आता खेळायला जायचं.
जाऊ द्यायची ती पण लवकर येशील म्हणूनच.
परतल्यावर स्वयंपाक तिचा असायचा बनूनच.
... अशी माझी माय रोज रोज कसायची.
        दुःखात कधी खोटं नाटं हसायची.
इतकी ती चांगली आहे मी तिला कधी सांगलं नाही.
आमच्या सुखाशिवाय तिने काही देवालाही मांगल नाही.
पण तिच्यासाठी कविता केली ती मात्र आवडते तिला.
यातच जीवाचं थोडंसं समाधान वाटत असते मला.
हे तिच्यासाठी आहे तिला कळलं जरी नसेल.
कवितेत माझ्या माझी आई नक्कीच असेल.
-रेखा उत्तमराव राऊत
   (विदर्भ एक्सप्रेस :समाजमनाची सफर )

मायसाठी

दुद पेता पेता मीनं एकदा तिले डसलं होतं माझीच थोरली बहीण म्हणाली
जवा मी माय झाली मले मया मायचं काळीज मयामंदीच दिसलं होतं.

-रेखा उत्तमराव राऊत

माय कविता

पोरके झालो जरी दुःखात आसवांच्या ती न्हाऊ देत नाही...||
आपली असो की कुणाची माय उपाशी जाऊ देत नाही...||

-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
समाजमनाची सफर 

Wednesday, April 13, 2022

भीमराव

"सोसलेला तो घाव गड्याने खराच होता.
हो भीमराव माझा समतेचा झराच होता."
-रेखा उत्तमराव राऊत
मु.खंडणी
(समाजमनाची सफर )

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...