"लिहिता लिहिता, वाचता वाचता."
श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घेऊ शकतो. लेकुरवाळ्या दांपत्याच्या घरात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. नपुंसकांच्या चाळीत साहित्यिक जन्म घेऊ शकतो. खरं तर साहित्यिकाचा जन्म उद्भवतो तो समाजमनासाठी. यथेश्च सृष्टीचा भावनाविलास अधोरेखांकीत नमूद करण्यासाठी .मनाच्या कोपऱ्याचे सर्वस्व इतंभूत मांडण्यासाठी. साहित्यिकाचा जन्म एक अविस्मरणीय क्षण असावा. असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी काही विष तयार झालं आणि काही अमृत तयार झाले;म्हणून अमृत आणि विषाची उत्पती एकाच माध्यमातून झाली असं आपल्याला वाटत असणं चुकीचं नाही. एखाध्या व्यक्तीची जेव्हा हेळसांड होते किंवा मनाची घुसळण होते . तसेच त्यांना योग्य वागणूक दिली जात नाही किंव्हा आर्थिक, भावनिक,मानसिक कारण कुठलं ही असो मनाचा कोंडमारा होतो. मनातील घुसमट कुणाजवळ व्यक्त करता येत नाही. अशा वेळी आपल्यातील प्रवृत्ती सादर होऊ लागतात. याचा परिणाम असा असतो की बालपनापासून आपल्या मेंदूवर जे जे बरे वाईट संस्कार झाले त्यांच उद्भवलेल्या परिस्थिती रुपी मंचकावर घर्षण सुरु होतं. याचे साम्य पुन्हा आपण समुद्र मंथनाशी केलं तर मिळालेले विष आणि अमृत रुपी तत्व तयार झालेले दिसून येतील.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जेव्हा लिहायला वाचायला शिकल्या. त्यांनी स्त्री शिक्षणाच पवित्र काम हाती घेतलं सोबतच त्या समाजातल्या अज्ञाय अन्यायावर कविता करू लागल्या " एकच शत्रू असे आपला तो म्हणजे अज्ञान. पाहिला का ? दिसला का? " ही त्यांच्या समाजोपहित जोपसणारी कविता अज्ञान रुपी समाजाला ज्ञानरूपी देणं देऊन गेलीया.तर चला मग आज आपण लिहिता लिहिता वाचता वाचता बेंजमीन फ्रँकलीन विषयी थोडं जाणून घेऊ. लहान बेंजमीनला त्याच्या घरचे सर्व बेन म्हणून हाक मारत. बेंजमींनचे वडील अगरबत्त्या बनवण्याचा छोटासा धंदा करत. तसं पाहता त्यांचं चांगलंच मोठं कुटुंब ज्यामुळे बेन ला जास्त शिक्षण घेता आलं नाही. त्याला शाळेत जाऊन शिक्षण घ्यायला आवडत असलं व अगरबत्त्या बनवण्यात रस नसला तरी तो कुठलीच हालगर्जी न करता वडिलांचा अगरबत्त्या बनवण्यात मदत करायचा. तो आता कविताही करायला लागला होता. आपलं लिखाण सुधारावं म्हणून त्याने एडिसन च्या निबंधांची पारायने ही केली होती असं साने गुरुजी हिमालयाची शिखरे वर्णन करताना लिहितात. धन्य ची साहित्यिक म्हणावा. शून्यातून आकड्याची सुरुवात करणारा बेंजामीन. ज्याच्या चांगलेपणाची, प्रामाणिक व्यक्तिमत्वाची, साध्या राहणीमानाची, सदैव कामात असण्याची व्यक्तीरेखा पटायची नाही तो बेंजामीन छापखाना काढतो काय बुडीत आलेल्या दुसऱ्या वृत्तपत्राला स्वबळावर विकत घेतो काय पण परिस्थितीशी हार मानणे ज्याच्या स्मृतीला, आचारा -विचाराला आणि कर्माला देखील पटणार नाही असा हा बीझीबोडी बेंजामीन नेहमी आपल्या स्मरणात रहावा असाच.
-रेखा उत्तमराव राऊत
No comments:
Post a Comment