Monday, March 28, 2022

भीमराय

भीमराय **
___________________________________
दुःख याप यातना
असतील आता काय...?
दलितांचा कैवारी
झाला हो भीमराय...||धृ °||

एक ओंजळ पिऊन पाणी
झाले तळे चवदार...||
शिकून सवरून होऊ मोठे
देऊ आयुष्या आकार...||
गरिबीत किती पिळली
आपल्यासाठीच रमाई माय...||1||

आजही आहे आणि
होतं हो काल...||
तुझं नी माझं
रकत लाल....||
मग जातीभेद हा
कुठून आला हाय...||

मुलगा मुलगी भेद नको
समतेचे गीत हवे...||
गाडून सगळ्या अंधश्रद्धा
पेरू क्रांतीचे बीज नवे... ||
आपल्यासाठीच भीमा रमाने
सोसले हो हो काय काय...||2||

संविधान लिहूनिया,
दिधले नागरिक हक्क...||
उजळवूनी दाही दिशांना
ज्ञानाचा प्रकाश हो लख्ख...||
 भीमराय आमचा वाली
भीमराय आम्हाला साह्य....||3||

ऐकून भीम गर्जना
जय भीम क्रांतिकारी...||
जुलमी रूढी परंपरांची
फजित झाली सारी...||4||

दुःख याप यातना
असतील आता काय...?
दलितांचा कैवारी
झाला हो भीमराय...||

-विदर्भ एक्सप्रेस
समाजमनाची सफर
(रेखा उत्तमराव राऊत )
____________________________________


No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...