दावणीला बांधलेले लाखे धवरे बैल आहे.का उगा मोकाट जावे दावे कुठे सैल आहे. अज्ञानी अडाणी रुपी माणसाला अनिष्ट रूढीची परंपरेची दावण तोडून कसं मुक्त होता येईल. तो तिला जसाच्या तसा स्वीकारेल. पिढ्यान पिढ्या तो जोपासतच राहणार. या दुष्ट प्रथा त्यांना न जुमानता स्त्री शिक्षणासाठी समाजाचा रोगलोभ पत्कारणारी सावित्री. ज्योतिबा स्वर्गवासी झाल्यानंतर ही सत्यशोधक समाजाची धुरा नेटानं सुरु ठेवणारी सावित्री. अरे आली होती कोरोनासारखीच एक महामारी तिच्या काळात नाव होतं तीच प्लेग. त्या प्लेग मधी जन्मानसाची सेवा करता करता मेली बिचारी. ती. तीच सावित्री जी या भामट्या जगाच्या तावडीत आली नाही.
हो तीच सावित्री जी डोक्यावर पदर घेऊन मुलींना शाळा शिकवाले जायची. हातातल्या झोऱ्यामधी एक लुगळं जास्तीच घेऊन. का? तर या अडाण्या समाजाले काय माहित होतं ती शिक्षणाचं चांगलं काम करायला जाते आहे. ती दगड मारायची शेण मारायची सावित्री फक्त एवढं म्हणायची तुम्ही मारलेले शेण दगड मला फुलासारखे वाटतात;कारण मी समजघडवण्याचं एक चांगलं काम करत आहे. पानांफूल्यावर शिकली ती समाजाची उद्धाकर्ती झाली ;आणि जिच्यामुळं लिहायला वाचायला शिकली मी त्याच्यासाठी दोन शब्द लिहू नये तर लेखणी माझी व्यर्थ आहे.