Friday, December 31, 2021

सूर्यास्त

   भेटशील तू मला एकदा|
 समशानभूमी म्हणली आहे ||
जाशील कुठे सोडून मला|
मी तुझ्याचसाठी बनली आहे ||
     -रेखा उत्तमराव राऊत 

Saturday, December 25, 2021

माहेर

____________________________________
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
____________________________________

घडी घडी येतं नाई वं थे दोन दिसा साठीच येते
बहीण पाहुणपणाले...|
मंग आनंदी आनंद होतो घरच्यादारच्या शेजाऱ्यापाजाऱ्याले...|
सुक दुकाचा असा गोंदर गोंदर कसा वाटतो
मनाले...|
जसा थयला घेऊन आलो आठवड्याच्या
बजाराले...|
अशी मिरून मिसरून जाते घरात घेते चूल
सारवाले...|
मने जाताना भावाले बहीण आले धनी
कारवाले...|
तिच्या बॅगीले गाळीत ठेवतानी मया डोऱ्यात
पाणी आले...|
सांग अजून कवा येशील वं वळ घेऊन बाई मले
 भेटायाले...|
-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
समाजमनाची सफर 
____________________________________
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
____________________________________

Monday, December 20, 2021

मैत्री

            ___________________________________
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
___________________________________

                     कुणी हसरे आहे.
       कुणी रागीट आहे.कुणी बोलके आहे.
            तर कुणी शांत शांत आहे.
     कुणी आंबट तिखट गोड असेही आहे.
    आणि कुणी कुणीतर लटके झटके आहे.
... पण कसेही असो फ्रेंड्स आपले हटके आहे.
             -रेखा उत्तमराव राऊत
                (विदर्भ एक्सप्रेस )
                समाजमनाची सफर

____________________________________🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
         ||साहित्यिकांनो लिहिते व्हा.||
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
___________________________________


Friday, December 17, 2021

माझी शाळा

           मया घराच्या जवळच जिल्हापरिषद
शाळा हाय. शाळेच्या परवेश दारावर शाळेचं नाव टाकलेला एक फलक हाय. थ्या फलकावर लिऊन हाय. जिल्हा परिषद कनिष्ट पार्थमिक शाळा खंनी. मंनी ची सोबतीन खंनी. तितच माई बालवाडी बी हाय. बईन मले तिच्यासंग तिच्या मोट्या शाळेत बसू देत नाई. मास्तर तिले शिवा देते म्हणते. पण आमची बालवाडी नं दुपार वरीच रायते. दोनवाजता सुट्टी होते तिले. मंग मी खिसडी खाऊन घरा येतो नं. कवकवा डब्ब्यातच देते मास्तरीण बाई. मंग मले कोणतंच काम नाई रात. मी घरापाच्च्या नळाचं पाणी भरून ठेवतं आण वारलेले कपडे काडून ठेवतं. मंग झाळझुळू काडतं आण झापूटं बांदून मया सोबतीनीच्या घरी दिवस जातवरी घेलाले परतो. मले एकच सोबतीन हाय शिपी. थे नं मी एकाच वर्गात हाव. तिले लवकरच राग यते. आण लवकरच बोलतोय पण आमी. पण मनानं चांगली हाय थे.आण तशीच बेस हाय आमची मास्तरीणबाई. आमाले अ, आ, इ, ई,उ,ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ :शिकवते. आण आमाले एक, दोन,तीन, चार, पाचं, सहा, सात, आट, नवं, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंदरा, सोळा सतरा, अटता, एकोणवीस, वीस,.... बी शिकवते. मले यते नं वं आई मस्त. मी गाणं म्हणून दावते थांब.

   ये गं, ये गं मंदा
 झाला का गं धंदा
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

ये नं गं शालू
घे नं गं आलू
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

ये गं ये गं अरचे
घे नं गं मिरचे.
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

ये नं गं नंदा
घे नं गं कांदा
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

              हू ss हू ss मस्त हाय नं गाणं मले पाठ हाय नं. पण मले काऊन का मोट्या शाळेत जाऊ वाटते. म्या जवा सा वरसाची झाली नं तवा मी मोट्या शाळेत जा ले लागली. आव भाय मस्त शाळा हाय. मस्त दरवाज्यापाशी बगीच्यावानी कागदीफुलाचे झाडं लोटून पडले हाय. त्याच्या बाजूनच गेट च्या मांग एका बाजूले रांजीचे बुळं हा आण दुसऱ्या बाजूले निंबाचं आण उमरीच झाडं हाय. तितच दाटन मनून जास्वंदाच आण कनेराच बी झाडं हाय तितचं भीतीजवळ आमच्या बालवाडीची हिरवीगच्च तुळशी हाय. आण दोन तीन कत्या पानाचे शो चे झाडं आण शेवट कोनट्यात आमचा संडास. इकडं आंगणवाडीच्या समोर दोन पायऱ्या हाय आण उजव्या बाजूले लांचं एक पाण्याचं टाकं हाय. तितं बाई पावसकाळ्यात पाणी जमा होते आण पाणी गेला का किटकूर पळतात मंग मोटे मोटे पोर थे सपान करते.थ्या पायऱ्याच्या डाव्या बाजूले लांचं मोगऱ्याच झाडं हाय आण एक कत्त शो चं झाडं आण तितच एक मोट पांडऱ्या फुलाचं झाड हाय. त्याची सावली बाई मोग्र्याच्या झाडावर थोळशी पडते मनून का! का!!हे झाड जास्त वाडतच नाई. मंग त्याच्या बाजूले अजून कत्त शोचे एकदोन झाडं हायतितच एक शिवणसागाच मोट झाडं हाय त्याची फुल उन्हाळ्यात मस्त पळतात पिवरी पिवरी. आण पान पल्ली का सर आमाले उचलाले लावते. आण  मंग तितं गुलाबी आण पांढरा सदाफुल्या पण हाय. तितच गोल आर करून एक मनी पलांट मस्त गोल आकारात वाडलंय. तीतून मंग वरंड्यात जाले घसरगुंडी सारक्या पायऱ्या हाय. आण त्याच्या बाजूले कटगर नं त्याच्या बाजूले आमचा झेंडा. थ्या झंड्याच्या भोवताल बारीकबारीक कापलेलं गादी गवत हाय आण सदाफुल्या हाय त काई कत्ते शो चे काई झाडं हाय एक दोन बुटके मेंदीचे मया पायाच्या गुळग्यायवडे काई त्याच्यावून लान झाडं हाय आण वर्गाच्या दरवाज्यापाशी वरनड्याच्या ख्म्बाजवळ एक शतावरी चा यल हाय थो चांगला पसरला हाय. पोर पार्थनेले उबे रायले का होय यल त्यायच्या तोंडावर आण कानात गुदगुल्या करतो वं. कवकवा याच्यावर हे काऱ्या काऱ्या टोल्या टोल्या आसवली पळतात. आण मंग पायऱ्या च्या दुसऱ्या बाजूले पयले लान मंग मोटं शिसवाच झाडं हाय आण शिवणसाग हाय. अशे आळवे पोरापोरीचे सवछता घर हाय. आण कोणट्यात सुबाबरीच झाडं तितं हाय नं वांग्याचे बी झाडं आण करावंदाच झाडं हाय लई वानावानाचे हाय. तितं आमची हापशी हाय तितच पाणी प्याच आण वर्गात जाऊन बसाच. त याबाजुले निम आण शिवनसागाची झाडं हाय.तितं मेती,पालक, भेदरं,झेंडू आण वांग्याचा वापा हाय आण इत कोणट्यात कचरा कुंडी तितं वला आण सोकला केर टाकाचा त्याच खत बनवाच आण झाडाले दयाच. तितं मोगऱ्याचे बी झाडं हाय आण सिमिटच्या आऱ्यामदी आधामधात मेंदीची चांगली दोन तीन फुटाची झाडं हाय. आण थ्या झाडायमदी मोट रिटाच झाडं हाय. मयदानात दगळ नाई कि काई नाई सपान मयदान हाय आण मयदानाच्या मदात चवकोन इटाच्या आऱ्यात एक बदामच झाडं हाय तितं मयदी आण सदाफुल्या हाय.
        उभी आंगणवाडी आण त्याले लागून सातवीचा एक वर्ग समोर वरंडा त्यालेच लागून अजून एक वरंडा आण दोन वर्ग. पहिल्या वर्गात पहिली ते तिसरीचे पोरं बसाचे आण तितच मुख्याध्यापकाचे आफिस आण दुसऱ्या वर्गात चवती ते पाचवी आणि आंगणवाडीले लागून हाय थ्या वर्गात सावी ते सातवी.आण कोनट्यात संडास आण पोरापोरीची मुतारी आण तितं चांगली हिरवीगच्च मेंदीची झाडं आण सदाफुल्या हाय. शाळेच्या मांग गावापोळ हाय आण त्यायचा आडवा रस्ता हाय.झाडझूडं हे जरी पेरमळपणाच परतीक वाटतं आसन पर शिकशन कडक हाय इथलं.

-कु रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
समाजमनाची सफर 

सोगा

लवकरच दिवस मावळत आहे आजकाल. हू थंडीचे दिवस लागले नं जी. बरे बाई मला पाऊसकाळा आणि उन्हाळ्यापेक्षा

Tuesday, December 14, 2021

प्रेमवेडी कविता

चांदण्याच्या रात्रीला आला गं,सखा मला भेटायला आला गं|
रिदयात धळधळ साठली.आणि मला लाज वाटली||

....रेखा उत्तमराव राऊत
 (विदर्भ एक्सप्रेस )
समाजमनाची सफर 🌸🌿

Sunday, December 12, 2021

विदर्भ एक्सप्रेस

   कसा तू तावात येतो,कसा तू आवात येतो.
तुझा संदर्भ तुझ्या हृदयाच्या प्रत्येक घावात येतो.
     -रेखा उत्तमराव राऊत
        (विदर्भ एक्सप्रेस )
      समाजमनाची सफर 

कविता अश्या का असतात?

       कधी हसवतात
तर कधी रडवतात कविता.
     कधी बिगडवतात
तर कधी घडवतात कविता.
       कधी वेचतात 
तर कधी तुडवतात कविता.
      कधी वाट देतात
तर कधी अडवतात कविता.
............. कविता
 अश्या का असतात?

-रेखा उत्तमराव राऊत 
(विदर्भ एक्सप्रेस )
समाजमनाची सफर 🌸🌿

Friday, December 10, 2021

मले काय पायजेन

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌸मले काय पायजेन🌸
________________________________
वांजूटल्या पदरात तान्हूली सोनी दे...|
यकयक नाई मले माय बाप दोन्ही दे...||धृ °||

मले दुक नाई लागत वं कष्टाचं कामाचं...|
मोयतर सुरु होते माय नाव घेऊन रामाचं...|
रिकामट्या हाताले रे भार घामाचा मानी दे....||

आव घासातला घास सांग कोण देत नाई....|
जिवाभावाचा भाऊबंद कोण होत नाई....|
देणार नाई दगा असा मले मैतर जानी दे...||

सरू दे नं घरातल्या हांडक्यातल्या मडक्यातलं......|
आणून टाकीन पुन्हापुन्हा मया घामातल्या
धुळक्यातलं....|
बळ मया छताळाट आता आसमानी दे...||

आव पोटभर जेऊ दे नं हितभर जागा दे ...|
आण किरकिर कायले वं पिरमाचा धागा दे....|
दुःखाचं गायराणं संग सुखाची गाणी दे....||


मले सरणावर नेजो बँड बाजा बारातीत....|
नोको वाटुदे मयत जशे आले वरातीत....|
नाय त थळग्याले मया भेट येऊनी दे....||


असे इचार इचार मये हाय भरमसाठ....|
जगण्याच्या धडा मले हाय तोंडपाठ....|
खचलेल्या मना मया आधाराची गाणी दे...||

वांजूटल्या पदरात तान्हूली सोनी दे |
यकयक नाई मले माय बाप दोनी दे |
                 - रेखा उत्तमराव राऊत
                  (विदर्भ एक्सप्रेस )
             🌸समाजमनाची सफर🌸
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Thursday, December 9, 2021

मनातलं काहीतरी

🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 
 कुणाला कुणाची ओढ असते.                     
 कुणाला कुणाची जोड असते.
कुणाला कुणाशी होड असते.
.... सगळेच सारखे नाही आहे.

कुणी कुणी जगतोय आशेवर.
कुणी कुणी मरतोय आशेवर.
कुणी कुणी आशा सोडतंय-धरतंय.
....... कुणाकडे तर आशाही नाही आहे.

कुणाला वाटते चांगले आहो आपण.
कुणाला वाटतं वाईट आहो आपण.
कुणाला तर काहीच वाटत नाही.
....... असेही म्हणणे खोटे आहे.

कुणी तर लिहितो आवड म्हणून.
कुणी लिहितो सवड म्हणून.
कुणाला तर लिहिणे भाग आहे.
कुणाला नं लिहिणे भाग आहे.
.......किती हा वेगळेपणा आहे.

हे असे तारतम्य मी
कधी कधी जोडत बसते.
कधी लिहिते दोन ओळी
तर कधी कधी त्याच खोडत बसते
..... हसते -फसते -दिसते काय ते.
आयुष्यावीन माझे तर अस्तित्व ही नसते.

-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
rekharaut025@gmail. com
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭

Wednesday, December 8, 2021

पेरणी :वराडी कविता

टाका भुईत बियाणं, करा पेरणी पेरणी.
पोटी पिकून येईन, माय धरणी धरणी.

घात मिरगाचं झालं, गेलं दिवस आकाळ.
आउत फाडते सारं, गेलं भरून आबाळ.
कशी वावरात टिबे पोरं तरणी तरणी.

मंदी मोडला मोगाळू, वाडी तासत बसला.
देल्ला इसार भरून, बळी खुशीत हसला.
घरी वली बाळातीन, सुकी वरणी वरणी.

हाका मारते धुऱ्यावून, कारभारीण जेवाया.
बांधू शेतात झोपडी, पाण्यापावसात रावाया.
यावं बहरून रान, घाम गाळूनी गाळूनी.

आज झालं मोयतीरं, बियं पडलं मातीत.
राबराबतो बळी राजा, तेल मिळावं वातीत.
आता सपान पाहतो, सोनं यावं उगवूनी.

टाका भुईत बियाणं, करा पेरणी पेरणी.
पोटी पिकून येईन, माय धरणी धरणी.

        -रेखा उत्तमराव राऊत
          (विदर्भ एक्सप्रेस )
rekharaut025@gmail. com

Tuesday, December 7, 2021

विदर्भ एक्सप्रेस:रेखा उत्तमराव राऊत

घाम गाळला कष्टाने,
शेत फुले माळावर.
घडे नशीब आमचे,
नांगराच्या फाळावर.
@rekhraut🌿

Sunday, December 5, 2021

भीमराव

सोसलेला तो घाव गड्याने खराच होता.
हो भीमराव माझा समतेचा झराच होता.
  -रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )

Saturday, December 4, 2021

बाप

जवा उपाशी तापाशी बाप वळतो आउत. भूक जाते मरून एव्हडी बापाची पाऊत. सोगा बापाचा आकूड घट्ट भेटा डोकश्याले. कसा राबतोय व बाप पीळ मारून घशाले. झोप ढोरावांनी यते स्वप्न जागेच राहते. जरी कष्टाचीही नदी तीत कोरडीच वाहते. बापाचं हे रडगाणं, रडगाणं वाटतं नाही. हार मानत बाप आण कवाच रडत नाही. -रेखा उत्तमराव राऊत

Thursday, December 2, 2021

जात्यावरलं गाणं

विदर्भ एक्सप्रेस -रेखा राऊत       🌸जात्यावरलं गाणं 🌸
आव पसा पसा दळ व जवारीचं दाणं.
दोरी हालव हालव हाय निजलं व तान्ह.

तान्हा निजला पाळण्यात वं.
आवं सई रमली गाळण्यात वं.

बाळ उठायच्याआधी दाणं दळून होऊदे.
घरकाम उरकून व मले वावरा जाऊ दे.

वावरात धनी मया वाट पाहते पाहते.
ओवीचं हे गाणं मिया सुरात गावते.

असं गाणं मायं छान.
जसं लाजाळूचं पान.

फुटू दे रे मुखातून मया पीठ भाकरीचं गाणं.
गाणं गावता गावता समदं दळलं व दाणं.

दळलेल्या दाणीयाची मिया भाकरी शेकीनं.
दोनघास चिल्ल्यापिल्ल्या मंगचं मिया खाईन.

मया धन्याच्या सोबती मिया सुकात राईणं.
घाम गाळून गाळून फळ कष्टाचं खाईन.

घाम गळतो शेतात असा पिगर पिगर.
आयुष्याचे खाच कटीन मन निबर निबर.

होते दळून पीठ बी यावं पांढरं पांढरं छान.
मन असं निबर गावते जवा अत्यावरलं गाणं.

-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )

विदर्भ एक्सप्रेस

🌸वऱ्हाडी चारोळी 🌸

चटणीत घाल पाणी
  तेल नसलं जर.
संकटाशी लढणं शिक
जगायचं असलं तर.

-रेखा उत्तमराव राऊत 

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...