Friday, December 17, 2021

माझी शाळा

           मया घराच्या जवळच जिल्हापरिषद
शाळा हाय. शाळेच्या परवेश दारावर शाळेचं नाव टाकलेला एक फलक हाय. थ्या फलकावर लिऊन हाय. जिल्हा परिषद कनिष्ट पार्थमिक शाळा खंनी. मंनी ची सोबतीन खंनी. तितच माई बालवाडी बी हाय. बईन मले तिच्यासंग तिच्या मोट्या शाळेत बसू देत नाई. मास्तर तिले शिवा देते म्हणते. पण आमची बालवाडी नं दुपार वरीच रायते. दोनवाजता सुट्टी होते तिले. मंग मी खिसडी खाऊन घरा येतो नं. कवकवा डब्ब्यातच देते मास्तरीण बाई. मंग मले कोणतंच काम नाई रात. मी घरापाच्च्या नळाचं पाणी भरून ठेवतं आण वारलेले कपडे काडून ठेवतं. मंग झाळझुळू काडतं आण झापूटं बांदून मया सोबतीनीच्या घरी दिवस जातवरी घेलाले परतो. मले एकच सोबतीन हाय शिपी. थे नं मी एकाच वर्गात हाव. तिले लवकरच राग यते. आण लवकरच बोलतोय पण आमी. पण मनानं चांगली हाय थे.आण तशीच बेस हाय आमची मास्तरीणबाई. आमाले अ, आ, इ, ई,उ,ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ :शिकवते. आण आमाले एक, दोन,तीन, चार, पाचं, सहा, सात, आट, नवं, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंदरा, सोळा सतरा, अटता, एकोणवीस, वीस,.... बी शिकवते. मले यते नं वं आई मस्त. मी गाणं म्हणून दावते थांब.

   ये गं, ये गं मंदा
 झाला का गं धंदा
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

ये नं गं शालू
घे नं गं आलू
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

ये गं ये गं अरचे
घे नं गं मिरचे.
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

ये नं गं नंदा
घे नं गं कांदा
मी छोटूशी भाजीवाली
छान छान छान.

              हू ss हू ss मस्त हाय नं गाणं मले पाठ हाय नं. पण मले काऊन का मोट्या शाळेत जाऊ वाटते. म्या जवा सा वरसाची झाली नं तवा मी मोट्या शाळेत जा ले लागली. आव भाय मस्त शाळा हाय. मस्त दरवाज्यापाशी बगीच्यावानी कागदीफुलाचे झाडं लोटून पडले हाय. त्याच्या बाजूनच गेट च्या मांग एका बाजूले रांजीचे बुळं हा आण दुसऱ्या बाजूले निंबाचं आण उमरीच झाडं हाय. तितच दाटन मनून जास्वंदाच आण कनेराच बी झाडं हाय तितचं भीतीजवळ आमच्या बालवाडीची हिरवीगच्च तुळशी हाय. आण दोन तीन कत्या पानाचे शो चे झाडं आण शेवट कोनट्यात आमचा संडास. इकडं आंगणवाडीच्या समोर दोन पायऱ्या हाय आण उजव्या बाजूले लांचं एक पाण्याचं टाकं हाय. तितं बाई पावसकाळ्यात पाणी जमा होते आण पाणी गेला का किटकूर पळतात मंग मोटे मोटे पोर थे सपान करते.थ्या पायऱ्याच्या डाव्या बाजूले लांचं मोगऱ्याच झाडं हाय आण एक कत्त शो चं झाडं आण तितच एक मोट पांडऱ्या फुलाचं झाड हाय. त्याची सावली बाई मोग्र्याच्या झाडावर थोळशी पडते मनून का! का!!हे झाड जास्त वाडतच नाई. मंग त्याच्या बाजूले अजून कत्त शोचे एकदोन झाडं हायतितच एक शिवणसागाच मोट झाडं हाय त्याची फुल उन्हाळ्यात मस्त पळतात पिवरी पिवरी. आण पान पल्ली का सर आमाले उचलाले लावते. आण  मंग तितं गुलाबी आण पांढरा सदाफुल्या पण हाय. तितच गोल आर करून एक मनी पलांट मस्त गोल आकारात वाडलंय. तीतून मंग वरंड्यात जाले घसरगुंडी सारक्या पायऱ्या हाय. आण त्याच्या बाजूले कटगर नं त्याच्या बाजूले आमचा झेंडा. थ्या झंड्याच्या भोवताल बारीकबारीक कापलेलं गादी गवत हाय आण सदाफुल्या हाय त काई कत्ते शो चे काई झाडं हाय एक दोन बुटके मेंदीचे मया पायाच्या गुळग्यायवडे काई त्याच्यावून लान झाडं हाय आण वर्गाच्या दरवाज्यापाशी वरनड्याच्या ख्म्बाजवळ एक शतावरी चा यल हाय थो चांगला पसरला हाय. पोर पार्थनेले उबे रायले का होय यल त्यायच्या तोंडावर आण कानात गुदगुल्या करतो वं. कवकवा याच्यावर हे काऱ्या काऱ्या टोल्या टोल्या आसवली पळतात. आण मंग पायऱ्या च्या दुसऱ्या बाजूले पयले लान मंग मोटं शिसवाच झाडं हाय आण शिवणसाग हाय. अशे आळवे पोरापोरीचे सवछता घर हाय. आण कोणट्यात सुबाबरीच झाडं तितं हाय नं वांग्याचे बी झाडं आण करावंदाच झाडं हाय लई वानावानाचे हाय. तितं आमची हापशी हाय तितच पाणी प्याच आण वर्गात जाऊन बसाच. त याबाजुले निम आण शिवनसागाची झाडं हाय.तितं मेती,पालक, भेदरं,झेंडू आण वांग्याचा वापा हाय आण इत कोणट्यात कचरा कुंडी तितं वला आण सोकला केर टाकाचा त्याच खत बनवाच आण झाडाले दयाच. तितं मोगऱ्याचे बी झाडं हाय आण सिमिटच्या आऱ्यामदी आधामधात मेंदीची चांगली दोन तीन फुटाची झाडं हाय. आण थ्या झाडायमदी मोट रिटाच झाडं हाय. मयदानात दगळ नाई कि काई नाई सपान मयदान हाय आण मयदानाच्या मदात चवकोन इटाच्या आऱ्यात एक बदामच झाडं हाय तितं मयदी आण सदाफुल्या हाय.
        उभी आंगणवाडी आण त्याले लागून सातवीचा एक वर्ग समोर वरंडा त्यालेच लागून अजून एक वरंडा आण दोन वर्ग. पहिल्या वर्गात पहिली ते तिसरीचे पोरं बसाचे आण तितच मुख्याध्यापकाचे आफिस आण दुसऱ्या वर्गात चवती ते पाचवी आणि आंगणवाडीले लागून हाय थ्या वर्गात सावी ते सातवी.आण कोनट्यात संडास आण पोरापोरीची मुतारी आण तितं चांगली हिरवीगच्च मेंदीची झाडं आण सदाफुल्या हाय. शाळेच्या मांग गावापोळ हाय आण त्यायचा आडवा रस्ता हाय.झाडझूडं हे जरी पेरमळपणाच परतीक वाटतं आसन पर शिकशन कडक हाय इथलं.

-कु रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
समाजमनाची सफर 

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...