पोटी पिकून येईन, माय धरणी धरणी.
घात मिरगाचं झालं, गेलं दिवस आकाळ.
आउत फाडते सारं, गेलं भरून आबाळ.
कशी वावरात टिबे पोरं तरणी तरणी.
मंदी मोडला मोगाळू, वाडी तासत बसला.
देल्ला इसार भरून, बळी खुशीत हसला.
घरी वली बाळातीन, सुकी वरणी वरणी.
हाका मारते धुऱ्यावून, कारभारीण जेवाया.
बांधू शेतात झोपडी, पाण्यापावसात रावाया.
यावं बहरून रान, घाम गाळूनी गाळूनी.
आज झालं मोयतीरं, बियं पडलं मातीत.
राबराबतो बळी राजा, तेल मिळावं वातीत.
आता सपान पाहतो, सोनं यावं उगवूनी.
टाका भुईत बियाणं, करा पेरणी पेरणी.
पोटी पिकून येईन, माय धरणी धरणी.
-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
rekharaut025@gmail. com
No comments:
Post a Comment