आव पसा पसा दळ व जवारीचं दाणं.
दोरी हालव हालव हाय निजलं व तान्ह.
तान्हा निजला पाळण्यात वं.
आवं सई रमली गाळण्यात वं.
बाळ उठायच्याआधी दाणं दळून होऊदे.
घरकाम उरकून व मले वावरा जाऊ दे.
वावरात धनी मया वाट पाहते पाहते.
ओवीचं हे गाणं मिया सुरात गावते.
असं गाणं मायं छान.
जसं लाजाळूचं पान.
फुटू दे रे मुखातून मया पीठ भाकरीचं गाणं.
गाणं गावता गावता समदं दळलं व दाणं.
दळलेल्या दाणीयाची मिया भाकरी शेकीनं.
दोनघास चिल्ल्यापिल्ल्या मंगचं मिया खाईन.
मया धन्याच्या सोबती मिया सुकात राईणं.
घाम गाळून गाळून फळ कष्टाचं खाईन.
घाम गळतो शेतात असा पिगर पिगर.
आयुष्याचे खाच कटीन मन निबर निबर.
होते दळून पीठ बी यावं पांढरं पांढरं छान.
मन असं निबर गावते जवा अत्यावरलं गाणं.
-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
No comments:
Post a Comment