~हा देश माझा~
___________________________________
रंग शांतीचे संमृद्धीचे अन
शौर्याचे अंगी लेवीतो देश माझा||
विविधतेत नटलेला
क्रांतीयज्ञात तपलेला हा देश माझा ||
हा देश माझा |हा देश माझा देश माझा ||धृ °||
गाते भूपाळीचे गाणे वनमाळी|
देते पिकवून मोती माती काळी|
काळ्या मातीचा,शूरवीरांचा
आपुलकीच्या नात्यांचा हा देश माझा |
हा देश माझा |हा देश माझा |हा देश माझा ||1||
ओसरीवरी सांगते गोष्टी
जुन्या पुरानाच्या आजी |
चवदार सयंपाक करते
लई वं बाई आई माझी |
गोरगरिबांचा कष्टकऱ्यांचा
शेतकरी बापाचा हा देश माझा ||
हा देश माझा |हा देश माझा |हा देश माझा ||2||
शाहू फुलेंचा हा देश माझा|
बाबासाहेबांचा हा देश माझा|
शिवरायांचा हा देश माझा|
सावित्रीच्या लेकींचा हा देश माझा ||
हा देश माझा |हा देश माझा |हा देश माझा ||3||
हो ss हो ss हो ss हो हो हो
आ ss आ ss आ ss
आ sss आ आ आ sss
जंगलात राहते करते रक्षण वनराईचे|
आम्ही वनवासी हो लेकरं भुमाईचे |
रान वने वृक्षवल्लीचा हा देश माझा |
बिरसा,शामादादा, दुर्गावतीचा हा देश |
हा देश माझा |हा देश माझा |हा देश माझा ||4||
हिंदू मुस्लिम शीख इसाई
सगळे आहो भाऊ भाऊ |
एकजुटीने मिळुनमिसळून
सुख समृद्धीने इथे राहू |
डोंगर दऱ्या नदी समुद्र
उंच उंच हिमालयाचा हा देश माझा ||
हा देश माझा |हा देश माझा |हा देश माझा ||5||
-रेखा उत्तमराव राऊत
(विदर्भ एक्सप्रेस )
मु. खंडणी
ता. मारेगाव
जि. यवतमाळ
पोस्ट. म्हैसदोडका
____________________________________
No comments:
Post a Comment