Sunday, March 27, 2022

बापमाणूस

          *बापमाणूस *
___________________________________
बाप शेती करायचा मी
ऑफिसात काम करायचो.
बाप पोटासाठी राबराब राबायचा
मी सहज म्हणून कधी कधी हातात आउत धरायचो.
हल्ली जोरदार पाऊस आला
आमच्या पिकाचं नुकसान झालं
मला फक्त बापाच्या व्यथा
कवितेत मांडता आल्या होत्या.
प्रत्यक्षात मात्र त्याच्या काळजाच्या
 चिंध्या चिंध्या झाल्या होत्या.
... आणि म्हणलं पोटात कसं तू
पचवतोस रे बाबा.
बाप हसून म्हणाला!
मी बाप आहे न रे बाबा.

-विदर्भ एक्सप्रेस
समाजमनाची सफर
(रेखा ऊ. राऊत )
____________________________________

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...