Saturday, March 26, 2022

आमच्याकडे असा वसंत येतो.

                  कविता
____________________________________
~*आमच्याकडे असा वसंत येतो.*~

टोपली टोपली मोगऱ्याची फुले बनून येतो...||
रंग होळीचे खेळणारी मुले बनून येतो...||
गुलाबी गुलाबी कण्हेराचा बहर बनून येतो...||
मार्च येडिंग मधले सुस्त शहर बनून येतो...||
 पळसाची गर्द केशरी केशरी डहाळी बनून येतो...||
ऐन परीक्षा केंद्रावर भरारी पथकाच्या धाळी बनून येतो...||
अन दिसाच्या लायनीने गोसायाची द्वारी
 द्वारी स्वारी बनून येतो...||
हरभरा गव्हाची ओंबी ओंबी अन कटानी
 ज्वारी बनून येतो...||
तहानलेल्या पांथस्थाला पाणपोई बनून येतो...||
पाण्याची वणवण वणवण डोई बनून येतो...||
 भरीतभर नववधूच्या लग्नाची धांदल बनून येतो...||
सोन्या चांदीच्या महागाईची झलझल बनून येतो...||
घरात कापूस नसताना कपाशीचा वाढलेला भाव बनून येतो...||
गुलाब मोगरा जास्वंद जाई जुई चाफा अन कण्हेरराव बनून येतो...||
... आमच्याकडे असा वसंत येतो.
-विदर्भ एक्सप्रेस
समाजमनाची सफर
(रे. ऊ. राऊत )
___________________________@rekh📝


No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...