Thursday, February 3, 2022

माय -दिवाळी विशेषांक आत्मबल साप्ताहिक 2021

  बरोबर च्या लेकरावर हात कसा उचलावा म्हणून बाप विचार करतो पण माय दोन गालफटात लगावून मोकळी होते. कायले करते एवढं माय!मायं च काळीज वं कारण आपणच म्हणतो नं बाप म्हणजे देव माणूस मंग माय आण बाप काई येगळे येगळे नाई. बाप देवमाणूस हाय तं त्याचाच आत्मा म्हणजे आपली माय असते वं. आणि आपल्या आत्म्याचा काळजाशी संबंध. पित्याचं काळीज जरा खंबीर असतं. ते सोसून घेतं. पण मायचं काळीज मायेच्या ओल्याव्यानं ओतप्रोत झालेलं असतं आण काळजात घाव झाला का वरमतो नं वं आपुन;म्हणूनच का काय कधीही आपल्याला काही दुखापत झाली का बाबा वं!नं म्हणता सगळ्यांच्या तोंडून आई वं असा चं उद्गार निघतो. बगा मा वं असा उद्गार निघतो नं.
           माय ही माय असते. तुमी बायकोच्या कपाटात बगा, ढगनाभर साड्यांचा ढीग असतो. पण मायच्या कपाटात काय असते माहितीय!आपल्या लहानपणीच्या" शी "च्या बालुत्यांपासून तं आपण मोटं होत पर्यंतच्या मायेने ओथंबलेल्या आठवणीच आठवणी असतात. इथं पासून तर एकाचे दोन हात करून देईपर्यंत तुमच्या आमच्या सर्व आठवणी. ती कपाटात म्हणा. गाठोड्यात बांधून जपून ठेवत असते. नव्हे!त्या आठवणी ती जगत ही असते.
           आपल्याला माहितीय शाळेत जाताना माय दोन तीनच रुपये द्यायची खाऊसाठी आणि म्हणत पोटभराची वस्तू घेऊन खा. मले सांग माये यावं दोन -तीन रुपयात खरच कोणती एवढी पोटभराची वस्तू येते वं मायं...!पण हे व्यवहाराचं गूढ ज्ञान ती समजून उमजून नं विसरता देते. अगदी बापासारखं की त्या गोड धोड चॉकलेट पेक्षा, संत्रीच्या, खोबऱ्याच्या आणि पेबरमिटच्या गोळ्यांपेक्षा यात येणारी पोटभराची वस्तू वस्तू म्हणजे काय वं. बिस्कीट आण बिरेड. मंग तेच घ्याच. खाऊन टाकाच. शाळेतल्या नळाच गटागटा पाणी पेलं आण शर्टाच्या बाहीनं तोंड पुसत धावत जाऊन वर्गात बसायचं. काय गम्मत हाय!माय कितीही रागावली तरी मायेन जवळ घेतेच. नाही का? म्हणूनच कदाचित आपली बहिणाबाई आपल्या कवितेत गोड आवाजात म्हणते की "जिले फुटला ना पान्हा, तिले माय म्हणू नये "माय म्हणल्यावर पान्हा फुटणारच दूध गळणारच. तान्हा पोटभर जवा पेइन तिच्या मनाचं समाधान होईन.
            जवा माय वृद्ध होते. अनुभवाची तिच्याकडं काठी असते. त्या काठीला आधार होणं प्रत्येक मुलाचं कर्तव्यच हाय. मंग असं नाई मनू शकत का मी जर जिले पान्हा फुटला नाई तिले माय म्हणू नये तर ज्यानं मायबापाची सेवा नाई केली त्याले लेकरू (मुलगा /मुलगी )म्हणू नये. आण सुनेचं बी. जशी आपली माय तशी लोकाची माय नाई का!सासू झाली म्हणून का तिच्या जीवाचे यले कराचे. आण माय आली का पुरणाचा सयंपाक कोण सांगलं!!मायचं काळीज खूप मोटं असतं. प्रेयसीला धोका दया. प्रियकराला धोका दया. तो किंवा ती "अच्छा सीला दिया तुने मेरे प्यार का "म्हणत सगळं विसरून जाईन. वेळ प्रसंगी बहुदा ही वेळ येऊ शकते. पण मायले तुमी तीच काळीजच काय प्राण ही मागले तरी ती बिचारी हसत हसत देईन. ते एक चित्रपट आहे बगा "उतावळा नवरा "नावाचा मायेच्या काळजाची कुणी परीक्षा घेवू नये. ते एवढं निर्मळ निरागस हाय का त्याची सर कायलेच यत नाई. तुमचा पैसा आडका काहीच त्याची बरोबरी करू शकत नाई. तिचं प्रेम या सर्वांपेक्षा वरचड हाय. पवित्र हाय. आणि अनमोलच हाय ते हो मायचं प्रेम.निर्मळ,निरागस,निस्वार्थी प्रेमाचा अथांग समुद्र म्हणजे खरच आपली माय हाय. जी आपलं सगळं आयुष्य लेकरायसाठी आजीवन वाहून घेते.
     ती उशाशी टक लावून बसते. तवा माय डाक्टर हाय का!का वाटते. जवा माय सोबतीणीशी भांडू नोको म्हणते. चांगली राय म्हणते तवा माय मास्तर सारकी वाटते. जवा लेकराले दुद पाजते मंग माय स्कंदमाता वाटते. जवा बाप गेल्यावर माय अदार होते तवा माय बाप बी वाटते. खंबीरतेन पाटीशी उभी रायली का माय दुर्गा चंडी बी वाटते. आण आला का राग तिले जर!आपण चांगलं नाई वागलं तर. मंग माय काय बी भेटो फेकून मारते. बेलन्यान, चपलान काय नं बी मारते तवा ती मले साक्षात कालिमाता वाटते. पण खरच माय असली का सर्व सुक नशिबी असल्यासारकी वाटते. आण खरच अजुनयं कळलं नसन तं त्याले विचारा ज्याले माय नाई त्याले कसं वाटते.
      -विदर्भ एक्सप्रेस
    समाजमनाची सफर
-कु. रेखा उत्तमराव राऊत

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...