Wednesday, February 2, 2022

आयुष्याच्या पुस्तकाचे धडे हजार असतात.

     पहाव्या, स्मराव्या आणि आठवाव्या रात्री निरव असतात.दिवस गलक्यात जातो. जरासे सावरावे रवीराजा काय खाचाखाच ठेचा देतो. मला आयुष्याचं कोडं आहे. कितीदा उलगडत नाही.मर्म जाणून मी काय करावे. मर्मात कितीदा मीच सापडत नाही. विचार कसे आडवे -तिडवे गटांगळ्या घेतात. छेदून पुन्हा काळजाला माघारी येतात. जगणे हे जगणे बिगणे निव्वळ बिव्वळ काही नाही. मी व्यस्त आयुष्यात जरा रिकामी बाही नाही. पिळून घे घाम थोडासा. रमुन जा गमतीत जरासा. शांतीचा नी क्रांतीचा बुक्का बिक्का लावुन घे. मिळेल तिथे शोध जागा मिळेल तिथे मावून घे. बघू सुख दुःखाचा दर्प नं ज्याला असे कोणतेच वार नसतात. आयुष्याच्या पुस्तकाचे धडे हजार असतात.
     -विदर्भ एक्सप्रेस
   समाजमनाची सफर 

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...