Friday, February 11, 2022

आनंदसागर

काहीशा आनंदमहोत्सवी रंगछटांनी रंगलेला हा परिसर किती मनमोहक आहे..... अरे हे स्वप्न तर नाही ना!कसले स्वप्न!!मी आज जिथे उभी आहे ते एक आनंदाचे सागर आहे.हो. आनंदसागर! ईश ss किती लाजतात ही फुलं. हो ना बाईची जात कधी कधी तिच्या निखळ लाजण्याने ही शोभूनच दिसते.
    ते बघा आगगडी. बसा जी मग लवकर त्यात. ती झुकझुकझुक गाणे गात सैर करून आणते. हू!किती मस्तय नं या मासोळ्यांचं घर. आणि बाई कारंजाची कलाकारी विचारू नये. तसे बी मला वेलीनी झाकलेला पूल च आवडतो. खाली त्या बदाकी क्वक क्वक करत नुसत्या पोहना करतात. खेळणी तर आहेच पण खेळल्यावरीच भारी मजा. हिरवगार जिकडंतिकडं मेहंदीचं बगीचच बगीच आणि नवनव रंग ल्यालेली फुलं नी झाडझूडं वेलीने सजलेला आनंदसागर.

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...