करू अभ्यास
वनस्पतीचे शास्त्र
जाणू तरुस
रसायनांचे
रसायन शास्त्र हे
एक शस्त्र हे
समजू गोष्टी
गं प्रणिशास्त्रातल्या
शरीरातल्या
मराठी माझी
माय जगती थोर
मराठी माझी
आली गं बाई
पर देशातून गं
इंग्रजीबाई
गणित कच्चे
कोणाचे असू नये
सूत्रच सच्चे
नकाशे सर्व
भूगोलात दिसते
मिळते रस्ते
म्हणे घडीचे
कारण दे विज्ञान
व्हावे सज्ञान
हिंदुस्थानची
हिंदी झाली बिंदी गं
स्वाभिमानाची
नागरिकांचे
हे नागरिक शास्त्र
अमूल्य अस्त्र
अर्थशास्त्राचे
श्री अँडम स्मितची
हो जनकची
-विदर्भ एक्सप्रेस
No comments:
Post a Comment