Thursday, February 17, 2022

हायकू

    सकाळ रोज
चाफा माळून येते
   आनंद होते

    सकाळ रोज
चाफा माळून येते
   लेवून साज
  
   आपल्या घरा 
या रे या पक्षानो या
   परतूनिया

  नको उसासा
रुसवा फुगवा रे
 करा मैत्री रे

   लांब होती गं
ती नारळाची शेंडी
  काल राती गं

   आला गं वारा
झुळू झुळूक आला
  आनंद झाला

   डुंबली नौका 
 एक वादळात गं
   सर्वांनी ऐका

  मला हवे गं
समतेचे गीतच
  नवी वाटच

    आई रमाई
थोर माऊली आहे
  सावली आहे

   झाली तु आई 
पहिली गं शिक्षिका
   सावित्रीबाई

   शामची आई 
माझा शाम गुणाचा
  म्हणे गं बाई 

    स्वप्न पहावे
आणि पूर्ण करावे
  सगळ्यांनीच

    शाळेत जाऊ
बाळा शिकूया शाळा
  छोट्या गोपाळा

     शाळेत देई
ज्ञान गुरुजी आम्हा
   बुद्धीची येई

  खेळ खेळूया
करूया व्यायाम हो
  आणि पळूया 

   आला मिरुग
करा पेरणी आता
   धरा सरता 

     शेतकऱ्याची
लेकरे आम्ही सगळी
    कष्टकऱ्याची 

   -विदर्भ एक्सप्रेस 

 



No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...