पाय लकशे आता मायं वय झालं. आवं मनून त मनतो. जगून जगून किती जगनार मिया. तुयाशी लगन केलं. असा संसार थाटला. मया सुका -दुकात तू मया सोबत होतीस. आवं आता लेकरं मोटी झाली. घरादाराला लागली. काऱ्याच पांडर तुय मय डोकसं झालं, तरी तू मया सोबत हायस... पण आयुष्याच्या या पिगर कचाट्यात तुयाशी दोन सबद सांगतो मनत होतो. ती पयली भेट माहित हाय का!जवा मी तुले पाले आलो होतो. आवड नावड आपल्या दोगाले बी ठाव नोयतं. तुई माई सोयरीक झाली कुकवाचे टिकले कपारावर खुशीत मिरवले गेले. साकरपुडा उरकला आण हांडकी मडकी कपडा लत्ता सर्व सामा झाला न नव्या बौल्यावर तुयं मायं लगन लागलं. मयाशी लगन करून तू मया घरी आली. आली त आली मवं घरं तुयं होऊन गेलं. यवडच का त मया दुकात ही तुयं बरोबरीच पानदान आलं. मी शेतावर जाचो. राबराब राबाचो. यात तुले कधी मी जत्रा बित्रात नेलं नाई . घातल्या भावाच्या घरच्या जुन्या पुरान्या साड्या नव्या बिया कपड्याची हाऊस तू बी केली नाई पोरगी झाली माय झाली सून मामी आजी झाली. घर तुयं सोडून तू दूर गावी आमच्यासाटी आली. मनून च का!... का!! बायको नवऱ्याला आदार वाटत आसनार मनतो.मनून दोन सबद बायको साटी खाली लिवत हाओ.
बायको : जा घरी अर्धी पिऊन
कुरकुरत असते बायको...||
झालं का बरं वाईट
हुरहरत असते बायको...||
पडलो जर आजारी
सारखी झुरत असते
बायको...||
नांदत असते नशीब म्हणून
हाल अपेष्टा मातीऱ्यात
जणू पुरत असते बायको....||
उपास तपास कुंकवासाठी
करत असते बायको....||
रंग सौभाग्याचे आयुष्यात
आनंदाने भरत असते बायको...||
लेकरं बाळ झाले की
मी माय म्हणून उरत
असते बायको...||
गेलं की कपाळाचं कुंकू
स्वाभिमानाच्या मनमंदिरी
अजून मुरत असते बायको....||
पाऊस काड्यात पानीच पानी न हिवाऱ्यात थन्डीचा तडाखा. घाल टोपरं सुटर. बांद टॉवेल न मोफलर.... हू ss हू आन उनाऱ्यात किती ऊन असते. असा मया ईदर्भ हाय राजा.तरी बी आपली सर्व्याचे गऊ कांडत बसलेली माई बायको सयंपाक पानी कपडा लत्ता करून कशी का थकत नाई तिच तिले माईत. आन मिया तीची वांवा केली तिले सांगू नोका बरं;कारण म्या हाव जाम कडक गडी आन थे हाय सादी सुदिक. असं न व जरा कदी बावरते मयाशी. पर जगण्याला मया आकार देणारी बया ती. कितीक दूविदा यतात. पोरगी लगन करून दुसऱ्याच्या घरा नांदायला जाते तवा. झिम्मा,फुगडी लगोऱ्या, टिपऱ्या करता करता बालपण जातं. अन उमललेले नवे बदल समजता समजत बी नाई नी बोहल्यावर नवरी बनून सजून धजून जाताना. हरदीत मलून पडलेला चयरा जरी खुलून दिसत असनार.मनात किती विचारांचं वादळच वादळ चाल्ल असतं न. झालं आजपर्यँत पोरीची कर्तव्य पार पल्ली गड्या आता संसार संसार तुया जीवाचा संसार. नांदा सुकान दोगं बी आशीर्वादान. घरात पयले पाऊल टाकलं तवा थोडंसं आनंदी वाटावं थोडंसं कुतूहल अन थोडंसं गोंदर बिंदर मनात यावा असच. पुढे परक्याचं धन मनून गनन्यात आलेली पोरगी दुसऱ्याच्या घरातल धन झाली. कुणाची ती बायको बनून लेकराबाराची माय झाली सून झाली. अन नवा नवा वाटनारा सपरी चा भाग पन आता आपलासा वाटतो हाय नाय आपलंच मनून घेनारी बायको. असे हे आपले अंतरआत्म्याचे ऋणानुबंध कायमचे मी आठवनीच्या मऊशार तावदानी जपून ठेवावे असेच.मले वाटते जन्माले आल्यावर परतेकाचा परतेकाशी कोनता ना कोनता ऋनानुबंध असतोच आन असला बी पायजे;कारन हो जीव हाय न यक दिवस नींगूनस जाचा हाय. कमवलं तेवळ ईतच रायनार हाय मग थे चांगलं काम रावो वाईट. पयसा रावो का जमीन धन दवलत सगळं ईतच रायनार मनजे रायनार. सांगाच यवळच भाऊबंद जीवाभावाचा ऋनानुबंध
परतेकान जपाव्या कारन काई दिवसाआदी मले दोन ओळी सुचल्या होत्या थ्या बगा " भेटशील तू मला एकदा, समशानभूमी म्हणली आहे... ||जाशील कुठे सोडून मला, मी तुझ्याचसाठी बनली आहे...||
-रेखा उत्तमराव राऊत
No comments:
Post a Comment