चिर्मटलेल्या कागदात
_______________________
बाप शेती करायचा.
मी ऑफिसात काम करायचो.
बाप पोटासाठी राबराब राबायचा.
मी सहज म्हणून कधी कधी,
हातात औत धरायचो.
हल्ली जोरदार पाऊस आला.
आमच्या पिकाचं नुकसान झालं.
मला फक्त बापाच्या व्यथा
कवितेत मांडता आल्या होत्या.
प्रत्यक्षात मात्र बापाच्या काळजाच्या,
चिंध्या चिंध्या झाल्या होत्या.
... आणि म्हणलं पोटात कसं काय
तू पचवतोस रे बाबा.
बाप हसून म्हणाला...
मी बाप आहे ना रे बाबा.
जीने जगाची भेट दिली आणि ज्याने जगाचं दर्शन घडवलं ते आईवडील. मी आईवर खूपदा लिहिलय आज वडिलांवर लिहीत आहे. तो वासराहक्काचा ठेवा पुन्हा सातबाऱ्यात चाळून बघतेय. ती वडीलमाया जी कधी व्यक्त होऊ शकत नाही त्या पुन्हा एकदा हिकवात्या नजरेनं न्याहाळून बघते आहे.बाबा ss... Ss... बाबा. मला नवीन वह्या घेऊन द्या बरं जी. माझी शाळा सुरु झालीये. मी अभ्यास कसा करू. माझ्याकडे लिहायला वह्या नाहीत जी. मी आता लिहिणार कशी बरं आणि कसा बरं स्वाध्याय सोडवू. माला जरा धीर धर बाबा आणतीलच वह्या सध्या तर घरात अडचणच सुरु आहे. आणि तुला माहित नाही बी भरणाला सगळा पैसा खर्च झालाय. आहे ते पैसे काही घरखर्चाला आणि मजुरांचं देण द्यायला असू दे बाबांकडे. काय नुसती वह्या वह्या ओरडत असते. माझ्या जुन्या वह्या आहेच की त्या वापर सध्यापूर्त्या.ताईने मालूला समजावत म्हणलं.मालू सध्या लहान असल्याने ती अशी पोरकट वागायची पण ताईने सांगितलेली आपल्या वडिलांची बाब लवकरच लक्षात आली.
सदा म्हणजे मालू चे वडील.आज जरा लवकरच तालुक्याला निघाले. काल पोर वह्या मागत होती म्हणून सदा पोरीसाठी वह्या पुस्तक खरेदी करायला आलेला. लोकांची पोर शिकतात मोठी होतात. नोकऱ्या करतात. आपली पोरगी झाली म्हणून काय झालं. तिचा ही जीव नवं. तिने का म्हणून शिकू नये. शिकलच पाहिजेत उद्या ती आपल्या पायावर उभी झाली तर या गरीब दरींद्री सदाची गुणी पोर म्हणूनच. म्हणून तो सरळ आज बँकच्या दिशेन चालू लागला. बँकेत गर्दी सकाळपासून असते. इथं ना बसायचं सुख ना खायचं सुख. आपल्या खात्यात असलेले काही पैसे काढतो आणि लेकीला वह्या आणतो म्हणून तो ही रांगेत लागला.जवळजवळ एकदीड वाजला सदाचा नंबर आला आणि खात्यातील काही रक्कम काढून तो वह्या च्या दुकानाकडे चालू लागला.तो पावसाला ही सुरुवात झालेली. पण मोठया ख़ुशीत
सदाने वह्या खरेदी केल्या आणि गावाकडे निघाला...कुणाला काही कळलं नाही. अचानक गर्दी झाली आणि फक्त एक ऍम्ब्युलन्स चा आवाज आला वं पाहता पाहता रस्त्यावरची गर्दी कमी झाली आणि कोसळणाऱ्या पावसाने फक्त लाल लाल रक्ताचा लोट ही नाहीसा झाला. सगळेच हुरहूर करत होते कुणीतरी एका वाटसरूला दुचाकीने अकस्मात धडकी दिली होती.
शेतात काम करत बसलेली त्या अपघात झालेल्या रुग्णाची बायको हायमोकडून रडत होती. कुण्या चारदोन नातलगकडून पैश्यांची जमवाजमव करून ताबडतोब पैसे बेडवर ठेऊन ऑपरेशन ची तयारी करण्यात आली... मालू फार गहिवरली होती. तिला कळलं होतं आपल्या वह्या पुस्तकांपेक्षा कपड्या-लत्त्यापेक्षा एका लेकरासाठी त्याचे वडील कितीतरी पटीने महत्वाचे असतात. मला आता वह्या नको पुस्तके नको. मी आहे त्या परिस्तिथीत शिकेन पण... पण...बाबा ss बाबा तुम्ही लवकर बरे व्हा म्हणून विनवणी करु लागली;आणि बरं वागलं....पैसा गेला पण जीव वाचला. कारभारीण चा धनी सुखरूप घरी आला. प्रकृती बरी होण्यासाठी घरी यायला दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली.सोबत काही सामान होतं. त्यात काही वह्या चिर्मटलेल्या कागदात मालूला मिळाला. ज्याला काहीसे रक्ताचे डाग आणि पावसाने भिजून चिर्मटलेल्या अवस्थेतील पुस्तक पाने दिसली तिला सगळं काही समजले... आणि पुन्हा कधी तीने असा हट्ट केला नाही आणि वडिलांचं नाव मोठं व्हावं म्हणून पुन्हा जोमाने अभ्यास करू लागली.
-विदर्भ एक्सप्रेस
No comments:
Post a Comment