Friday, July 15, 2022

घरचामाणूस

लेखाचे नाव : *घरचामाणूस*
____________________________________
*श्वास देते का...?*

 *संपलेल्या आशयाला*
 *आस देते का...?*
*त्रासलो गं जिंदगीला*,
*फास देते का...?*

*मोकळा झालोस नाही,*
*मी कुणाच्याहीकडे...||*
*काळजाच्या आत पडल्या*,
*आर्त भेगा नी तडे...||*
*ऐकशील तर सांगतो*,
*काही तास देते का...?*

*मी कुणाचा आधार आहे...||*
*हे जीने पण उधार आहे...||*
*वाटे मला जगावेसे,*
 *काही श्वास देते का...?*

*तुज वाटले तर साथ दे...||*
*मज सोबतीचा हात दे...||*
*आयुष्यात माझ्या,*
*हमखास येते का...?*

*मी खवळतो, शांत होतो...||*
*गारव्याचा प्रांत होतो...||*
*बघ तुझी नी माझी*,
 *एक रास येते का...?*

      विदर्भ एक्सप्रेस ची ही कविता वाचून सदाने चहा पाणी आटोपले न्याहारी केली आणि गोठ्यातील बैल औताला जुतून शेताकडे निघाला.
अरे सदा कुठं निघालास? रामभाऊच्या प्रश्नावर सदा उतरला.रामरामजी!काका काही दिवसांपूर्वी माझा अपघात झाला होता. सातआठ महिने झाले,काही जड काम करता येत नव्हती. आता बरा झालोय तर शेतात जरा औत हाकलून बघतो. असं शेतीवाडी दुसऱ्याच्या हाती देऊन किती दिवस चालायचं!आपलं आपल्यालाच पहा लागते आणि अडीअडचणीत लोकांनी खूप मदत केली. त्यांचंही देन चुकतं केलं म्हणजे भाऊबंदकीचा ऋणानुबंध कायम राहिल. सदा हे लई वाईट झालं म्हणा ;पण सगळ्या नशिबाच्या गोष्टी. हात धुवून बघतो म्हणून नशीब धुवून नाही ना बघता येत. हो ना काका! या आयुष्याचा कुढला डाव कसा पलटेल हे माहित नसणं म्हणजेच कदाचित नशीब. म्हणून नशीबाच नशीब बघत बसो. आपण आपलं कर्म करत राहणं म्हणजे जीवन असणार. नाही का!...हो असच काहीस. बरं काका निघतो मी. या वर्षी तसं सोयाबीन जास्त लावलं आणि तूर पराटी थोडी कमीच आहे. दुखापतीचा माणूस म्हणून थोडीभू-थोडीभू शेती करतो आता. बरं येतो मग म्हणून सदा शेताकडे निघून गेला.रामभाऊही आपल्या कामात व्यस्त झाले.
      माला ची आई ss ओ मालाची आई. काय गं काय झालं!इतकी का जोरात हाक मारत आहेस. अगं काही नाही.काही महिला आपल्या गावात नवीन बचत गट तयार करायचा म्हणत आहे. ह... तर मग!तर मग काय!!अगं ज्या महिला बचत गटात नसेल त्यांचा" बचत गट "तयार करायचा असं म्हणाल्या त्या. तू पण कुण्याचं गटात नाही ;आणि मी सुद्धा. आपण बनवायचा का गं आपला गट. आणि बचत गटाचे फायदे सांगू का? सांग बाई! आता तुला सगळंच माहित असेल. हो. तर बचत गटाचे फायदे असे की आपण शंभर- दोनशे जे काही महिना भरू ती रक्कम आपण बँकेत जमा करायची असते. तत्पूर्वी बचतगटाच खातेपुस्तक काढावं लागते. नंतर आपल्याला आपल्या गटाचे चेकबुकही मिळते. ज्या बँकेत आपला गट जोडला गेलाय त्या बॅंकेच्या नियमानुसार आपल्या बचत ठेवीवर व्याजदर ही मिळते. सोबतच आपल्या गटातील एखाद्या गरजू सभासदाला व्याजदरात कर्ज ही देता येते किंवा गरज पडल्यास बॅंकेतून कर्ज ही घेता येते. आणि बँकेने दिलेले कर्ज दिलेल्या मदतीत परत ही करता येते.वं बँकेतून मिळालेल्या कर्जाच्या पैश्यातून गटाचा एखादा व्यवसाय ही करता येतो किंवा वैयक्तिक पातळीवर शेळ्या मेंढया विकत घेऊन सभासदाला शेळीपालन सारखा फायद्याचा व्यवसायही करता येतो.
आता बाई फायदे तर सांगितले पण तोटे ही ऐक. बरं!तर तोटे असे की गटातून सभासदाने घेतलेले कर्ज दिलेल्या मदतीत नाही भरले तर त्याचे कर्ज वाढतीलच म्हणून वेळेत कर्जाची रक्कम परत करायला हवी सोबतच महिन्याला महिना किस्त भरत राहिल्यास आपल्या गटाचाच फायदा होतो. साधारणतः बचत गट याच साठी आपल्या कुटुंबाला अडीअडचणीत आर्थिक मदत व्हावी. जसं माझ्या मुलीचं लग्न आहे. लग्न करायला पैसा नाही किंवा पोरांचं शिक्षण आहे त्यासाठी बचत गटातून आपल्या योग्य मदत होऊ शकते. बरं बाई मला सगळं पटलं पण एकदा माझ्या घरचा माणूस येऊ दे.त्यांना विचारते आणि सांगते.हो हो विचार ना गं. घरचा माणूस म्हणजे घराचा आधार त्यांना ही विचारलेलं बरं बाई. हो. बरं येते मी जरा आमच्याही घरच्या माणसाला सांगते मी.

-रेखा उत्तमराव राऊत
खंडणी

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...