Friday, July 15, 2022

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव :
घे घे म्हणत घात आली.

        एक असतो नमुना आठ आणि एक असतो सातबारा. आठ चे महत्व राहण्यासाठी आसऱ्याला जागा आणि अडोशाला छत देणारा नमुना आठ. त्यासोबतच पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकऱ्याची नामी इस्टेट म्हणजे सातबारा. आजच्या परिस्थितीत ज्याच्या नावी सातबारा आहे काही नाही पण कुटकाभर जमिनीचा मालक म्हणून पटवारी आधी जमीन मालकाला विचारतो.तर अशीच एक सातबाराऱ्याची गोष्ट आता इथं व्यक्त करीत आहे.आज बँकेत जाऊन आलेली. भक्कम गर्दी होती. कुणी पैसे काढत होते टाकत होते. तसे पाहता मध्यवर्ती सरकारी बँकेत पैसे जमा करणाऱ्यांच्या तुलनेत पैसे काढणारे तर संख्येने जास्तच असतात. आंधळे, लंगडे, लुळे, पांगळे सर्व अपंग लोकं ही महिन्याला मिळणारी रक्कम उचलायला येतात. इथं निराधार उचलतात असं सगळं सोबतच मध्यवर्ती बँक म्हणजे शेतकऱ्याची बँक असं मला लहानपनापासुन वाटायचं ;कारण या बँकेत सगळेच शेतकरी लोकं बँक उचलतात. लाल्या उचलतात. त्त्यांना बोन्ड अळी इथूनच मिळते.माझ्या बाजूला एक आजोबा उभे होते. बँकेच्या पुस्तकाची झुरी प्रत घेऊन कुठल्यातरी आशेवर तिथं आलेली असणार एवढं खरं.
     काही वर्षांपूर्वी पाचसहा भावांनी वावर विकून खाल्लं आज त्याच्या लेकरांना दुसऱ्याच्या शेतात मरमर करावी लागतेय. काही जण शेत असून शेती करत नाही जमीन पडीत ठेवतात किंव्हा स्वतःला शेती करण्याजोगे असून वावर ठेक्यान देतात काय म्हणावं आता म्हणून ही मंडळी सहजच म्हणून जातात ही "अरे आम्हाला असतं वावर तर आम्ही ही गैरसोय केलीच नसती पण काय करते नाईलाज आहे. मला तरी वाटत शेती विकून सगळं नोकरी मिळण्याच्या कारणावरून किंवा अन्य कारणावरून शेतीच ठोबर तरी करू बसणं म्हणजे आजच्या परिस्थितीत चुकीच असणारच . शेती हा निसर्गाच्या मर्जीतला खेळ जरी असला तरी केलेल्या घामाइतकं भुई देतेच देते;म्हणूनच उभं रहायला जमीन आहे म्हणून काळ्या आईची सेवा करणारा आपला शेतकरी कधीतरी पूर्णतः सुखी व्हावा शेतकऱ्याच्या लेकरांना एवढं स्वप्न असतं.
 *~पेरणी* ~
टाका भुईत बियान, करा पेरनी पेरनी...||
पोटी पिकून येईन, माय धरनी धरनी...||धृ°||

घात मिरगाचं झालं, गेलं दिवस आकाळ.
आऊत फाडते सारं, आलं भरून आबाळ.
कशी वावरात टिबे पोर तरनी तरनी...||1||
टाका भुईत बियान, करा पेरनी पेरनी...||

मंदी मोडला मोगाळू, वाडी तासत बसला.
देल्ला ईसार भरून, बळी खुशीत हसला.
घरी वली बाळातीन, सुकी वरनी वरनी...||2||
टाका भुईत बियान, करा पेरनी पेरनी...||

हाका मारते धुऱ्याऊन, कारभारीन जेवाया.
बांदू शेतात झोपडी, पाण्यापावसात रावाया.
यावं बहरून रान, घाम गाळूनी गाळूनी...||3||
टाका भुईत बियान, करा पेरनी पेरनी...||

आज झालं मोयतीर, बियं पडलं मातीत.
रबराबतो बळीराजा, तेल मिळावं वातीत.
आता सपान पाहतो, सोनं यावं उगवूनी...||4 ||

टाका भुईत बियान, करा पेरनी पेरनी...||
पोटी पिकून येईन, माय धरनी धरनी...||
    ताईसाठी लिहिलेली ही कविता. शेतीमातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांनो एकदा मुखी आणून भरभरून प्रेम द्याल हीच आशा आहे. सोबतच आपल्या जमिनीत बी बियाणं पेरण्याच्या आधी आपल्या जमिनीचा पोत जाणून घेणं ही एका प्रगल्भ शेतकऱ्याच लक्षण असावं. तसे पाहता मातीपरीक्षण केंद्रात जाऊन आपली माती वं तिचा पोत आपुन जाणून घेऊ शकतो. बी -बियाणं घेताना आवश्यक असलेले नियम पाळून वं बियाणं घेतल्यानंतर व्यवस्तीत हवाबंद पाकिटातीलच बियाणे आपण आता घेणारच आहो. सोबतच बियानाची पावती ही आपण घेणारच आहो आणि उद्या जाऊन शेतीच्या कामासाठी ही पावती कामी येतेच. तर अशा प्रकारे बी भरानाची घात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीच भावई नाचून झालीय. आता मृग येईल आणि पावशा "पेरते व्हा, पेरते व्हा " म्हणत पेरणी करा म्हणून राहिलाय. हे धरीत्रे माये जननी जन्मभूमी वसुंधरे तुझ्या लेकरांनावर अशीच आभाळमाया राहू दे.

साप्तहिक_आत्मबल 

No comments:

साप्तहिक आत्मबल

लेखाचे नाव : "लिहिता लिहिता, वाचता वाचता."      श्रीमंतीच्या राजवाड्यात साहित्यिक जन्म घेऊ शकतो. गरिबीच्या झोपडीत साहित्यिक जन्म घ...