घरात होतं तळ साचलेलं,
भोवती काळोख दाटला होता...||
कुठे होती तिथं निद्रा,
सर्वत्र दीन अंधार होता...||
ओल्या सांजवेळी...
टिचभर पोट ते काहूर काढत होतं
थोडेसेही नव्हतेच भांड्यात अन्न...||
जगण्याचा एक असाही पैलू
मनास करीत होता खिन्न...||
ओल्या सांजवेळी...
हृदय होतं भरून आलेलं
आणि होती निराश मने...||
हतबल होत्या भावना
काय नशिबी आले जीने...||
ओल्या सांजवेळी...
ज्याचा त्याचा तो ;पण
कुणी नाही आपला होता...||
कोण कुणाचा आपुलकीचा
कोण कुणाचा आधार होता...||
ओल्या सांजवेळी...
लिंपून काढला त्याला ;पण
कुड गेला होता खचून...||
ओलं लागलं त्याला
पेंड गेला पडून...||
ओल्या सांजवेळी...
नभात वीज थय्या नाचत होती
अशी रात्र होती भयाण...||
ढगाचे गर्जने दचकवत होते
परिस्थिती किती होती भयाण...||
ओल्या सांजवेळी...
कधी कोसणे त्या देवाला
वेळ संपता संपत नव्हती... ||
हरलो नाही परिस्थिला... पण
परिस्थिती ही हरत नव्हती...||
ओल्या सांजवेळी...
पोटात अन्नाचा कण नाही की
काय ही बघ सत्वपरीक्षा...||
पाणीही पिण्याची इच्छा नाही
झोपमोड त्या डोळ्यांना
मदतीची न कुणाची समीक्षा...||
-रेखा उत्तमराव राऊत
No comments:
Post a Comment